नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे शिवजयंती निमित्त विनापरवानगी मिरवणुक काढली या कारणावरून 15 आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशा ता.शहादा येथे दि.19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान मच्छीबाजार परिसरात 80 ते 100 जनसमुदाय अशांनी प्रकाशा गावात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढून जिल्हा अधिकारी नंदुरबार यांच्या कोरोणा, ओमेक्रॉन विषाणूचा आदेशाचे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बॅन्ड लावून फटाके फोडून जमाव जमवून , विनापरवानगी मिरवणूक काढून सार्वजनीक शांततेचा भंग करून जल्लोश केला असुन जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी जिवितास व व्यक्ती सुरक्षेस धोका निर्माण होईल तसेच कोरोणा विषाणूचे संसर्ग पसरविण्याचे हईगइचे कृत्य करून सार्वजनिक उपद्रव करतांना मिळून आले म्हणून पोना संदिप विश्वासराव खंडारे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात सागर सुनिल पाटिल, अनिल मराठे, अजय निकुंभ , मुकेश काशिनाथ सुर्यवंशी , किरण रघूनाथ गुरव , पुष्पक दिपक गुरव , कपिल राजेंद्र गुरव , गजानन रतिलाल भोई , नरेंद्र शरद महाले , पंडित कल्लू भोई , इंदास भाईदास तांबोळी , नयन इंदास तांबोळी , जयेश पंडित मोरे , गौरव पंडित भोई . निलेश सुखदेव भोई , सर्व रा . प्रकाशा ता . शहादा यांच्या विरुद्ध भादवि कलम 268,269,290 सह महाराष्ट्र पो . कायदा कलम 37 ( 1 ) ( 3 ) चे उल्लंघन करून 135 , 112,117 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ( बी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ रामा वळवी करीत आहेत.








