नंदुरबार l प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या पातोंडा जवळील मातोश्री कॉलनीत चिमुकल्यांनी शिवरायांची जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करून प्रतिमापूजन करण्यात आले आहे. दरम्यान परिसर जय भवानी, जय शिवाजी अशा विविध घोषणांनी दुमदुमून गेला होता.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने करण्यात आली. याप्रसंगी चिमुकले मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वत्र कोरोनाचा परिस्थिती पाहता चिमुकल्यांनी मिरवणूक जागेवरच साऊंड सिस्टिम च्या तालावर ठेका घेत जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देऊन शिवजयंती अगदी साध्या पद्धतीने साजरा करून शिवरायांना अभिवादन करून प्रतिमा पूजन करण्यात आले आहे.










