नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
एजंटसाठी वय 18 ते 50 दरम्यान असावे व शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असावी. बेरोजगार किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतात.
उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास रुपये 5 हजार ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल जी एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरुपात राहील. इच्छुकांनी प्रवर अधीक्षक डाक घर कार्यालय धुळे येथे विहित नमुन्यातील अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रांसह 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित राहावे.
अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालीयाशी संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असून ती पूर्णत: कमिशन तत्वावर आधारीत आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर धुळे विभाग यांनी कळविले आहे.