Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : ते चोरी करून राहत होते शहराबाहेर, बँकेतुन पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून 1 लाख रुपये चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

team by team
February 17, 2022
in क्राईम
0
सावधान : ते चोरी करून राहत होते शहराबाहेर, बँकेतुन पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून 1 लाख रुपये चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे बँकेतुन पैसे कढणाऱ्यांवर पाळत ठेवून 1 लाख रुपये चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेत 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.नवीन व्यक्ती राहण्यास आल्यास त्या बाबतची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावी असे आवाहन नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र शामराव मराठे रा . जगतापवाडी , नंदुरबार हे दि. 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पत्नीसह स्टेट बँक ऑफ इंडीया नंदुरबार येथे 1 लाख रुपये बाजार व घरकामासाठी बॅकेतुन काढले . त्यानंतर त्यांनी पैसे त्यांच्या दुचाकी गाडीच्या डीक्कीमधील प्लास्टीकच्या पिशवीत ठेवलेले होते . महेंद्र मराठे हे बाजार करण्यासाठी नंदुरबार शहरातील नगर पालिका चौकात आले . अज्ञात चोरट्यांनी एक लाख लंपास केले.याप्रकरणी महेंद्र शामराव मराठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द् शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता . बँकेमधून पैसे काढणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून नंतर त्यांचा पाठलाग करुन रोख रक्कम चोरी करणे या नविन गुन्हे कार्यप्रणालीची ( MOB ) टोळी नंदुरबार जिल्ह्यात सक्रीय झाल्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे लक्षात आले.त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांची दोन पथके तयार केली . पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह बँकेमधून पैसे काढणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून नंतर त्यांचा पाठलाग करुन रोख रक्कम चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढण्याचे काम सुरु केले . अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील इंदौर , राजपुर इत्यादी जिल्ह्यातील असुन ते अल्पवयीन मुलांच्या मदतीने या प्रकारचे गुन्हे करतात व शहराच्या बाहेर वस्ती करून राहत असतात अशी प्राथमिक माहिती मिळाली . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नंदुरबार शहराच्या बाहेर वस्ती करुन राहणाऱ्या इसमांची माहिती काढण्याबाबत सांगितले . तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणारे व जेलमधून सुटुन बाहेर आलेल्या आरोपीतांची स्वतः देखील मध्य प्रदेश राज्यातील इंदौर , आदी जिल्ह्याकडून माहिती घेतली . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रीक विश्लेषणाचा अभ्यास केला असता पथकाला गुन्ह्याबाबत सुगावा मिळाला . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नव्हते . दि. 16 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार शहरातील कोरीट चौफुली येथे मध्य प्रदेश राज्यातील इंदौर येथील काही उतारु आलेले आहेत व ते बँकेतील इसमावर पाळत ठेवून चोरी करणारे आहेत . अशी प्राथमिक माहिती मिळाली . तसेच ते कोरीट चौफुली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून संशयीत इसमास ताब्यात घेवून पूढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेने नंदुरबार शहरातील कोरीट चौफुली येथे जावून संशयीत तरूणाचा शोध घेतला असता संशयीत इसम एका चहाच्या टपरीवर चहा पित असतांना दिसला . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधपणे चहाच्या दुकानाच्या आजुबाजुला सापळा रचला . परंतु संशयीत इसमास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला परंतु तत्पर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत इसमास शिताफीने पाठलाग करून निम नेमीलाल गुज्जर रा . गुरवा नगर , बिचौली मर्दाना , बिचौली खेडे , ता . जि. इंदौर, मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले . ताब्यात घेण्यात आलेला संशयीत इसम यास चोरीच्या घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे सांगितले व अल्पवयीन साथीदार सद्या नंदुरबार शहराबाहेरील कोरीट चौफुली येथे आलेल्या उतारुंमध्ये आहे असे सांगितले . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जावून सदर अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेतले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निम नेमीलाल गुज्जर व अल्पवयीन मुलाला सोबत घेवून निम नेमीलाल गुज्जर हा सद्या कोरीट चौफुली येथे राहत असलेल्या झोपडीमधून 1 लाख रूपये रोख कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केले . संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलाला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदर गुन्ह्यातील फिर्यादी महेंद्र शामराव मराठे रा . जगतापवाडी , नंदुरबार यांना चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले गेले असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन करून आभार मानले . आपल्या आजुबाजूला कोणी संशयीत व्यक्ती राहत असल्यास किंवा नवीन व्यक्ती राहण्यास आल्यास त्या बाबतची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावी असे आवाहन नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे . सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी संदीप जिजाबराव पाटील , सहा . पोलीस निरीक्षक , पोहवा प्रमोद गुलाबराव सोनवणे , पोना राकेश मोरे , पोकों अभय शशिकांत राजपुत , आनंदा पावबा मराठे , अभिमन्यु रमेश गावीत , पोकॉ शोएब जब्बार शेख , चापोना रमेश साळुंखे यांचे पथकाने तडीस नेली असुन अल्पावधी गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाखालील वाहतूक १७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत बंंद : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Next Post

निसर्गाचा अनोखा चमत्कार न्हवे : यामुळे बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून बाहेर पडत आहे पांढरा शुभ्र रस

Next Post
निसर्गाचा अनोखा चमत्कार न्हवे : यामुळे बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून बाहेर पडत आहे पांढरा शुभ्र रस

निसर्गाचा अनोखा चमत्कार न्हवे : यामुळे बामडोद शिवारात कडुलिंबाचे झाडातून 48 तासापासून बाहेर पडत आहे पांढरा शुभ्र रस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add