नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी प्रादेशिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत ५० हजाराचे पारितोषिक जिंकले.या विद्यार्थीनी पुढे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील युवकांमध्ये एच.आय.व्ही एड्स बाबत जनजागृती व्हावी याकरिता नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे ऑनलाइन प्रादेशिक प्रश्नमंजुषा प्रश्नोत्तरीय कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी रीया वासवानी व अलीना पराईल यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ४ राज्यांनी सहभाग घेतला ,यात महाराष्ट्र, बिहार , दादर नगरहवेली आणि अंदमान निकोबार यामध्ये मिशन शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाचे ५० हजाराचे पारितोषिक पटकावले. विद्यार्थीनी पुढे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .सदर विद्यार्थिनींचा सत्कार शाळेच्या प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. आर.पवार पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी व मान्यवर शिक्षक आदी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी ज्यू.कॉलेजचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे ,प्राध्यापिका पल्लवी पोळ, श्रीमती भामरे , महिमा नाईक यांनी मार्गदर्शन केले.