नंदूरबार l प्रतिनिधी
देशामध्ये कोरोना पसरवला , असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने खा.डॉ. हिना गावीत यांच्या घरासमोर दि.१८ फेब्रुवारी रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष
दिलीप नाईक यांनी नंदूरबार पोलीस निरीक्षक यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला , असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले , जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे . ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे . वास्तविक कोरोनाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असतांना ‘ नमस्ते ट्रम्प ‘ हा कार्यक्रम घेवून मोदींनी लाखोंची गर्दी केली आणि त्यामाध्यमातून कोरोना देशात पसरवला . देशात कोरोनाचे संकट कायम असतांनाही बिहार राज्यात विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या . परिणामी तेथे कोरोनाचा विस्फोट झाला . पुढील टप्प्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेला असतांना देखील या काळात पश्चिम बंगाल , आसाम , तामीळनाडू , केरळ आणि पोंडीचेरी या राज्यात विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या . खऱ्या अर्थाने कोरोना पसरविण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे . मात्र उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून , स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यातून केला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपाचे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा. डॉ . हिना गावीत यांच्या घरासमोर दि . १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिली.