नंदूरबार l प्रतिनिधी
संसदरत्न खा. डॉ. हिना गावित व आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते नंदूरबार तालुक्यातील मांजरे गावात जलजीवन मिशन या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खा. डॉ. हिना गावित यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हर घर नलसे जल” या ब्रीदवाक्याने जलजीवन मिशन ही योजना केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारुन पूर्ण देशात ही योजना राबविण्यात येत असून नंदूरबार जिल्ह्यातील मांजरे गावापासूनच या योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. यापुढे बोलताना खा. डॉ. हिना गावीत यांनी सांगितले की, ही योजना राबवित असताना मांजरे गावातील पुढील 30 वर्षाची लोकसंख्या लक्षात घेऊनच या योजनेचा नियोजित आराखडा (plan estimate) आखण्यात आला आहे. सरकारी यंत्रणेने हे काम लवकर पूर्ण करावे व चागले काम करावे असे निर्देश यावेळी दिले.तसेच केंद्रातील भाजपा सरकारची लोककल्याणकारी नीती व योजनांचा उल्लेख करतांना कोरोना काळातील अन्नसुरक्षा योजनेत सुमारे 80 कोटी लोकांना गेल्या 17, 18 महिन्यापासून मोफत रेशन दिले जात आहे, शौचालये दिली जात आहेत, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी दिला जात आहे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक परिवाराला आवास देण्याचे उद्दिष्ट केंद्रातील भाजपा सरकारने ठेवलेले आहे. आणि जलमिशन योजनेअंतर्गत पूर्ण देशात हरघर नलसे जल या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे असे खा. हिना गावीत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कोळदा गटातील जि.प. सदस्या डॉ.सुप्रिया गावित,नंदूरबार तालुका भाजपा अध्यक्ष दिपक पाटील,कोपर्ली गावाचे सरपंच विनोद वानखेडे,बह्याने गावाचे सरपंच छोटू राजपूत,सातूर्के गावाचे संरपच हिरालाल भाई,ओसर्ली गावाचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल राजपूत तसेच मांजरे गावातील सरपंच सौ. कविताबाई संजयसिंग राऊळ, शसंजयसिंग राऊळ, दगा सोनवणे, विलास पाटील व गावातील कार्यकर्ते,तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.