Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद परिसरात विद्यार्थ्यांकडुन खाजगी प्रवासी वाहने करीत आहेत दुप्पटीचे भाडे वसूल

team by team
February 16, 2022
in शैक्षणिक
0
म्हसावद परिसरात विद्यार्थ्यांकडुन खाजगी प्रवासी वाहने करीत आहेत दुप्पटीचे भाडे वसूल

म्हसावद l प्रतिनिधी
इयत्ता दहावी,बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असून पुर्वपरीक्षा सुरू आहे मात्र एसटी बस संपामुळे खेड्यावरून येणारे विद्यार्थी यांचे भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत असून खाजगी प्रवासी वाहने दुप्पटीचे भाडे वसूल करीत आहे.एसटी बंद असल्याने गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
याबाबत वृत्त असे की,शासन विलगीकरणाच्या मागणीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तोडगा अद्यापही सुटलेला नसल्याने या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणासाठी मोठ्या गावात शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन खासगी वाहन धारकाकडून होणारी लुट बघता ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेही टाळले असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने जनजीवन पुर्वपदावर येत  आहे.मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी शासन विलगीकरणाच्या मागणीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून बंद पुकारला असल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत तर पालकाची कोंडमारी होते आहे. प्रवाशांसह आजारी रूग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना तालूका व शहरीस्थळी येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे यातच खाजगी वाहनधारकाकडुन अवाजवी भाडे आकारले जात असल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त आहेत.कोरोनामुळे आधीच पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.त्यात दुष्काळात तेरावा महिना एसटी पण बंद झाली आहे.परिणामी विद्यार्थी, प्रवासीवर्ग हैराण झाला आहे.

शाळा सुरळीत झाल्या असून दहावीची पुर्वपरीक्षा सुरू आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे नंतर लगेच दहावीची परीक्षा मात्र एसटी बंद असल्याने सर्व खेळखंडोबा झालाय.गरीब आदिवासी विद्यार्थींना खाजगी वाहनात दुप्पटीचे भाडे देवून यावे लागत आहे.दररोजचा आर्थिक खर्च न परवडणारा असल्याने पालकवर्ग त्रस्त झाला आहे. एसटी बस लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.
श्रीमती सुरेखा गूजर, मुख्याध्यापिका
सती गोदावरी माता विद्यालय म्हसावद ता.शहादा

बातमी शेअर करा
Previous Post

मांजरे येथे खा.हिना गावीत व डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचा कामाचा शुभारंभ

Next Post

अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील वनजमिनींचे सीमाकांन करून हद्द निश्चित करण्यात यावी, नागेश पाडवी यांची मागणी

Next Post
कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत द्यावी :भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांची मागणी

अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील वनजमिनींचे सीमाकांन करून हद्द निश्चित करण्यात यावी, नागेश पाडवी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add