नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात चिंचपाडा जंगलात अवैधपणे वृक्षतोड करून नांगरटी केल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.
सहाय्यक वनसंरक्षक( प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून दि. 8 फेब्रुवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार, वनक्षेत्रपाल चिचपाडा, रेंज स्टाफ चिचपाडा, नंदुरबार सह कंपार्टमेंट नंबर 82 मध्ये गस्त घालीत असताना जंगलात अवैधपणे वृक्षतोड करून नांगरटी केलेली दिसली. या बाबत वनविभागाने दि.10 फेब्रुवारी रोजी रेंज स्टाफ चिचपाडा, गस्ती पथक जंगलात गस्ती घालीत असताना वंत्या भरत नाईक, गणेश बोंदल्या गावीत रा.चीचलीपाडा ता.नवापूर हे दोन जण त्यांना दि. 11 फेब्रुवारी रोजी प्रथम वर्ग 1 न्यायालय नवापूर यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावली.त्यानंतर त्यांची चौकशी केली करून दि. 14 फेब्रुवारी रोजी प्रथम वर्ग न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 फेब्रुवारी पर्यंत १५ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे. सदर कारवाहीत धनंजय ग.पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक,के.एम. बडुरे वनपाल कामोद पी.एस.पाटील वनपाल खोलविहीर वनरक्षक तुषार नांद्रे, संजय बडगुजर, रामदास पावरा ,आशितोष पावरा, मनीषा जाधव कविता गावित दीपा कापडणे देवमन सूर्यवंशी पी टी खैरनार व गस्ती पथक शहादा मधील वनकर्मचारी वाहन चालक चमाऱ्या गावित रोपवन रखवालदार बाळा गावीत ,यांनी सहभाग भाग घेतला.
सदर कार्यवाही ही दि.वा.पगार वनसंरक्षक धुळे उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा कृष्णा भवर, उमेश वावरे ,विभागीय वनअधिकारी दक्षता,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .