नंदूरबार l प्रतिनिधी
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत नंदुरबार
तालुक्यातील टोकरतलाव येथे 39 तर करजकुपे येथे 35 केशरी शिधापत्रीकेचे वाटप आ.डॉ . विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव व करजकुपे या गावांतील ज्या व्यक्तीचे नांवे शिधापत्रीका नाही किंवा जुन्या शिधापत्रीकेतुन नाव कमी करुन नविन शिधापत्रीका मागणी केल्याप्रमाणे आज दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता तालुक्याचे आमदार व माजी आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावीत , कोळदा गटाचे जि.प. सदस्या डॉ . सुप्रीया गावीत व भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते टोकरतलाव गावात एकूण 39 केशरी शिधापत्रीका व करजकुपे गावात एकूण 35 केशरी शिधापत्रीका वाटप करण्यात आल्या . त्यानंतर कोळदा गटाचे जि.प. सदस्या डॉ . सुप्रीया गावीत व आमदार व माजी आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावीत यांनी दोन्ही गावातील नविन वाटप केलेल्या शिधापत्रीका धारकाना मार्गदर्शन केले व नविन मिळालेल्या शिधापत्रीकांचा आधारे विविध शासकीय योजनेचे लाभ घेण्याबाबत आवाहन केले . यावेळेस नंदुरबार तालुक्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी कार्यक्रमांची प्रस्तावना करतांना सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत नंदुरबार तालुक्यात टोकरतलाव येथुन सुरुवात करुन आज टोकरतलाव येथील एकूण 39 केशरी शिधापत्रीका धारकांना घरपोच शिधापत्रीका वाटप करण्यात येत आहे . व दुपारी करजकुपे येथे 35 केशरी शिधापत्रीकाना घरपोच शिधापत्रीका वाटप करण्यात येत आहे व दर मंगळवारी याच प्रमाणे कार्यक्रम घेऊन ज्या ठिकाणी जास्त शिधापत्रीकाची मागणी राहील त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन घरपोच शिधापत्रीका वाटप करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार रमेश वळवी , पुरवठा निरीक्षण समराज वाडेकर ,आष्टे मंडळ अधिकारी मदन कावळे, तलाठी श्रीमती वैशाली काकुळदे, ग्रामसेवक गणेश मोरे , ग छोटुलाल बारकु पाटील, करजकुपे येथील सरपंच आशाबाई उदय ठाकरे , श्रीमती गोसावी , सुनील भदाणे , कांतीलाल ठाकरे स्वस्त धान्य दुकानदार करजकुपे व तहसिल कार्यालयाचे संगणक चालक संदिप सामुद्रे उपस्थित होते .
नंदूरबार तालुक्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की , ज्या व्यक्तीकडे, कुंटुबाकडे शिधापत्रीका नाही अथवा कुंटुब विभक्त राहत असेल तर विहित नमुन्यात अर्ज करुन शिधापत्रीकेची मागणी नोंदवावी . असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.