नंदुरबार l प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धाअंतर्गत प्रश्न मंजुषा, गाण्याची स्पर्धा, व्हिडीओ तयार करणे, पोस्टर डिझाईन तयार करणे, घोषवाक्य तयार करणे अशा पाच प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे.
राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धची सविस्तर माहिती https://ecisveep.nic.in/contest या संकेतस्थळावर उपलब्ध असून या स्पर्धत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणुक अधिकारी संजय बागडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.