नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील जामतलाव येथे वनविभागाचे पथक गस्ती घालत असताना रस्त्याच्या बाजूला नाल्यात अवैधरित्या साठवून ठेवलेले घडतळ केलेले लाकूड आढळून आल्याने सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जामतलाव येथे अवैधरित्या लाकूड साठवून ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक यांचेसह जामतलाव गावात जाऊन जामतलाव गावातील नाल्यात व रस्त्याच्या बाजूला पायी फिरून पाहणी केली असता नाल्यात गवताखाली खैर प्रजातीची लाकडे कुऱ्हाडीने घडतळ केलेले खैराचे ८१ नग मिळून आले. सदर मालाची बाजार भावानुसार किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. सदरच्या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार व धनंजय पवार व श्रीमती स्नेहल अवसरमल, वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक शिवाजी रत्नपारखे, वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक भिवाजी दराडे, वनपाल ए. एम. शेख, वनपाल बोरझर पी. एस. पाटील, वनपाल सुनिता पाटील, वनपाल वडकळंबी, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, विकास शिंदे, दीपक पाटील, अशोक पावरा, लक्ष्मण पवार, गिरीश वळवी, पिंकी बडगुजर, भाग्यश्री पावरा, दिपाली पाटील, अनिल वळवी, अमोल गावित, तुषार नांद्रे, रामदास पावरा, संजय बडगुजर, मनीषा जाधव, पी.टी. खैरनार, देवमन सूर्यवंशी, कविता गावित, वाहन चालक लालु पवार, दिलीप गुरव, वनमजूर छगन सोनवणे, बाळा गावित आदींच्या पथकाने केली आहे.
वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांनी केले आहे.