Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुष्पाच्या पावलावर पाऊल टाकत ट्रॅक्टर मध्ये शेणखतातून दारूची तस्करी करणाऱ्या लखनला पोलीसांनी पकडले रंगेहाथ

team by team
February 14, 2022
in क्राईम
0
पुष्पाच्या पावलावर पाऊल टाकत ट्रॅक्टर मध्ये शेणखतातून दारूची तस्करी करणाऱ्या लखनला पोलीसांनी पकडले रंगेहाथ

नंदुरबार | प्रतिनिधी
पुष्पा चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.या चित्रपटाचे फिवर अनेकांवर चढले आहे.सामान्य नागरिक या चित्रपटाच्या गाण्यांवर सोशल मीडियावर व्हिडिओ काढून विरंगुळा करीत आहेत.या चित्रपटात अल्लू अर्जुन याने पुष्पाचे व्यक्तिरेखा साकारत दुधाच्या टँकर मध्ये रक्त चंदनाची अवैध तस्करी करीत होता.त्याच्या सारखे दारूची तस्करी करण्यासाठी चक्क ट्रॅक्टर मधील शेणखतातून दारूची तस्करी करताना एकाकडून पोलिसांनी ९ लाखाच्या अवैध दारूसह १६ लाख १० हजार ८० रुपयांच्या मुद्देमालासह जप्त करीत त्याला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र पोलीस पोलीस उप – महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दि.१३ फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना बातमी मिळाली की दि.१४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मंदाणा ता . शहादा गावाकडुन एक लाल रंगाचे ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले असून त्याखाली देशी विदेशी दारुचे खोके ठेवून अवैध देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक करणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती , त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक,नंदुरबार पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर माहिती कळवून योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पिंपड़े ता . शहादा गावाच्या पूढे रस्त्यावर दबा धरून बसले असता ००.४५ वा सुमारास असलोद गावाकडुन पिंपडे गावाकडे एक लाल रंगाचे ट्रॅक्टर येतांना दिसले म्हणून पथकातील अमलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहाय्याने ट्रॅक्टर उभे करण्याचा इशारा देवून ट्रॅक्टर थांबविले . त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी आपली ओळख देवून ट्रॅक्टर चालक लखन ऊर्फ गणेश दला भिल रा.वाडी बुद्रुक ता . शिरपुर जि . धुळे असे सांगितले . ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरमध्ये काय भरलेले आहे बाबत विचारपुस करता त्याने ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले आहे असे सांगीतले.बाबत सांगितले मिळालेल्या बातमीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये शेणखत दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरमधील शेणखत बाजूला केले असता तेथे विदेशी दारुचे कागदी पृष्ठाचे खोके ठेवलेले मिळुन आले . ट्रॅक्टर चालकास दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याचेकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले तसेच ट्रॅक्टर चालकास सदरचा माल कोणाकडून आणला बाबत विचारले असता त्याने बोराडी ता . शिरपुर येथील पिंटु पाटील याच्याकडून घेवून अक्कलकुवा गावाच्या पुढे २ ते ३ कि.मी. वर सेाडण्यासाठी घेवून जात आहे असे सांगीतले. या ट्रॅक्टरमधील संपूर्ण शेणखत बाजुला करुन पाहता त्यात खाकी रंगाचे खोके दिसुन आल्याने खोके उघडुन पाहिले असता त्याल ६ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीची बॉम्बे व्हिस्कीच्या १८० एम.एल.चे एकुण ११० बॉक्स व त्यामध्ये ५२८० सिलबंद काचेच्या बाटल्या , १ लाख ६८ हजार ४८० रुपये किमतीची किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे ५०० एम.एल. चे एकुण ३९ बॉक्स व त्यामध्ये ९३६ बिअरचे पत्रटी टिन , ५५ हजार २०० रुपये किमंतीची माऊन्टस -६००० सुपर स्ट्रॉंग बिअरचे ५०० एम . एल . चे एकुण २० बॉक्स व त्यामध्ये ४८० बिअरचे पत्रटी टिन , तसेच ७ लाख रुपये किमंतीचे एक महिद्रा कंपणीचे ५७५ लाल रंगाचे ट्रॅक्टर व मागे ट्रॉली विना नंबरचे असलेले असा एकुण १६ लाख १० हजार ८० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला आहे. शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , पोलीस शिपाई विजय ढिवरे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणार : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

Next Post

धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

Next Post
धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add