नंदुरबार | प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथे अज्ञात चोरट्यांनी खिडकीच्या लोखंडी जाळी तोडुन आत प्रवेश करीत ६ लाख ३० हजाराचे २१ लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राप्त माहिनुसार.आज रात्रीच्या सुमारास वापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथे अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप ठेवलेल्या खोलीच्या खिडकीच्या लोखंडी जाळी तोडुन आत प्रवेश करीत २१ लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडली आहे.एका लॅपटॉपची किंमत ३० हजार आहे.असा एकुन ६ लाख ३० हजाराचे लॅपटॉप लंपास केले आहेत.शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी गणीत,इंग्रजी विषयाचे ज्ञात अवगत करण्यासाठी माईंन्ड स्पार्क सॉप्टवेअर मार्फत शिक्षा सेतु हा प्रॉजेक्ट राबविला जात आहे.या योजने अंतर्गत पानबारा आश्रमशाळेला २२ लॅपटॉप देण्यात आले होते.त्यातील एका लॅपटॉपची आधीच चोरी झाली आहे.त्यांनतर शनिवारी मध्यरात्री २१ लॅपटॉप चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शाळा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापक पी.पी.वसावे यांनी पोलिसात खबर दिल्यानंतर विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पथकासह या ठिकाणी पाहणी केली.यावेळी विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी ही घटनास्थळी भेट दिली.या ठिकाणी श्वास पथकास पाचारण करण्यात आल असुन विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.








