नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पिंपळा येथे शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यास गेलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी वायरीला चिपकलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याला देखील शॉक बसला असून सुदैवाने ते बचावले आहेत.
नवापूर तालुक्यातील पिंपळा येथील युसोफ नुजा गावीत (३१) हा तरूण शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला परंतु विद्युत शॉक लागल्याने स्टार्टर बॉक्समधील वायरला तो चिटकला. मोटार सुरू करण्यास गेलेला मुलगा अजून का आला याची खात्री करण्यासाठी गेलेले त्याचे वडील नुजा गोरजी गावीत हे त्याठिकाणी आले. मुलगा यसोफ हा वायरीला चिकटलेले पाहताच त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतांना नुजा गावीत यांना देखील विद्युत शॉक लागल्याने यसोफ गावीत या तरूणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत नुजा गोरजी गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.