Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुबार पेरणीच्या नैराश्यातून शेतकर्‍यांची आत्महत्या

team by team
July 22, 2021
in क्राईम
0
दुबार पेरणीच्या नैराश्यातून शेतकर्‍यांची आत्महत्या

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथे सेंट्रल बँकेतून कर्ज घेवून पिक पेरणी केली असतांना पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे पिक पेरणीचे दुबार संकट आले. या नैराश्यातून शेतकर्‍याने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील प्रविण आसाराम पाटील (४४) या अल्पभुधारक शेतकर्‍याने कोपर्लीतील सेंट्रल बँकेतून १ लाख २० हजाराचे कर्ज घेवून शेतात पिक पेरणी केली. परंतु जून महिन्यापासून दमदार पाऊस न झाल्याने पेरणी केलेली पिके धोक्यात आली. असे असतांना पिके वाचविण्यासाठी शेतकरी प्रविण पाटील हे रात्री अपरात्री जावून शेती पंपाद्वारे पिकांना पाणी देत होते. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट, डोक्यावर बँकेचे कर्ज या नैराश्येतून प्रविण आसाराम पाटील या शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शेतात पाणी देण्यासाठी गेलेले पती घरी परत आले नाहीत. म्हणून पत्नीने मुलगा व पुतण्यास पाहण्यासाठी पाठविले हे दोघेही शेततात गेले असता शेतकरी प्रविण आसाराम पाटील हे गहुस घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. मयत शेतकरी प्रविण पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत समाधान ईश्‍वर पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वरूपसिंग गावीत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

विद्युत मोटार सुरू करण्यास गेलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

Next Post

विद्युत मोटार सुरू करण्यास गेलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add