Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गरीब भूमीहीन आदिवासींना जमीन उपलब्ध करून देणार-ॲड.के.सी.पाडवी

team by team
July 23, 2021
in राज्य
0
गरीब भूमीहीन आदिवासींना जमीन उपलब्ध करून देणार-ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार ! प्रतिनिधी
 संकटाच्या काळात राज्य शासन गरीब आदिवासी जनतेच्या पाठीशी असून आदिवासींच्या कल्याणासाठी गरीब भूमीहीन नागरिकांना आदिवासी विकास विभागामार्फत जमीन सबलीकरण योजनेअंतर्गत बागायती शेतीसाठी 8 लाख व कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी 5 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारतर्फे शहादा येथे आयोजित खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार, दिलीप नाईक, ॲड. गोवाल पाडवी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा शेतीवर होणारा परिणाम  लक्षात घेता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येतील. भूमीहीन आदिवासींना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास त्यांना उपजिवीकेचे साधन प्राप्त होईल.
 जिल्ह्यात 2  लाख कुटुंबांना  खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यापैकी काहींची नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरीत पात्र कुटुंबांचीदेखील लवकरच नोंदणी करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. शबरी आवास योजनेअंतर्गत 12 हजार  लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. घरकूलासाठी जमीन घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी मका, तूर आणि सोयाबीन या पर्यायी पिकांची पेरणी करावी. टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा योजना करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजना राबविताना पाण्याचा शाश्वत स्त्रोत असल्याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिक्षणाच्या चांगल्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जि.प.अध्यक्षा श्रीमती वळवी यांनी केले.
माजी मंत्री वळवी यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते एकूण मोहिदा व लोणखेडा गावातील 547 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात खावटी कीटचे वाटप करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

विद्युत मोटार सुरू करण्यास गेलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

Next Post

परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली, नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली, नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add