तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील नेमसुशिल विद्यामंदिरातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली यावेळी चित्रफितच्या माध्यमातून लतादीदींचा जीवनप्रवास जाणून घेतला.
याप्रसंगी प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिंसिपल पी. डी.शिंपी मुख्या.गणेश बेलेकर, संदीप चौधरी, देवेंद्र शिंपी, कमलेश पाटील, अरुण कुवर, सुदाम मुजगे, नितीन भामरे, ईश्वर चित्रकथे, समाधान मराठे, रोहित यादव आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.