Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चौपाळे येथे खुनाच्या घटनेनंतर दुसऱ्या गटानेही दाखल केला पाच जणांविरुद्ध गुन्हा

team by team
February 7, 2022
in क्राईम
0
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे गटारीवर घराचे बांधकाम केल्यानेच घराजवळ गटारीचे पाणी साचते, असा समज करून सहा जणांनी तिघांना मारहाण करीत चाकूने वार केल्याची घटना घडली. याच घटनेत पहिल्या फिर्यादीनुसार चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या गटाने फिर्याद दिल्याने गैर कायद्याची मंडळी जमा करण्यासंदर्भात नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथे गावठाणच्या जागेवरील रस्त्यावर घर बांधकाम केल्याच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात चार जणांविरुद्ध नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या गटाने फिर्याद दिली आहे. याबाबत राजेंद्र भालचंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भालचंद्र राठोड यांनी गावठाण जागेच्या गटारीवर घराचे बांधकाम केल्याने गटारी अडविली गेली, त्यातील पाणी आपल्या घराजवळ येते म्हणून संदीप सुभाष कुमावत व इतर नेहमीच वाद घालत असे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री देखील त्यांनी वाद घातला. जोरजोराने शिवीगाळ केली. भालचंद्र राठोड हे त्यास समजविण्यासाठी गेले असता बन्सीलाल राठोड यांनी कॉलर पकडून गटारीत ढकलून दिले. राजेंद्र व त्यांचा भाऊ हे वडिलांना सोडविण्यासाठी गेले. परंतु तेथे कुमावत यांच्याकडील इतरही काही जण तेथे आले असता त्यांनी पकडून ठेवले तर संदीप कुमावत याने खिशातील चाकूने राजेंद्र राठोड यांच्यावर वार केला. त्यात त्यांच्या कमरेला दुखापत झाली. याप्रकरणी राजेंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून संदीप सुभाष कुमावत, कपिल सुभाष कुमावत, बन्सीलाल कुमावत, राकेश बन्सीलाल कुमावत, गणेश बन्सीलाल कुमावत, विजय कुमावत सर्व रा. चौपाळे, ता. नंदुरबार यांच्याविरुद्ध नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास हवालदार नरेश गुरव करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिनी घेण्यात आले रक्तदान शिबिर

Next Post

तळोदा येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या अभियानांतर्गत प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add