नंदुरबार | प्रतिनिधी :-
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज ९२ वर्षी निधन झालं.नंदुरबार जिल्ह पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यंानी लतादिदींचे पेन व पेन्सीलच्या सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत ५ बाय १० से.मि.चे रेखाचित्र रेखाटुन आगळी वेगळी श्रध्दांजली अर्पण केली.
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर आज अखेरचा श्वास घेतला.त्याच्या निधनाने शोककळा कोसळल्याने अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण करीत आहेत अशातच संवेदनशिल मनाचे,चित्रकार असलेले नंदुरबार जिल्ह पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यंानी लतादिदींचे पेन्सील व पेनच्या सहाय्याने रेखाचित्र रेखाटुन आगळी वेगळी श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी पेन व पेन्सीलव्दारे अवघ्या २० ते २५ मिनीटांत ५ बाय १० से.मि.चे रेखाचित्र रेखाटले.त्यांनी रेखाटलेल्या रेखाचित्रात जिवंतपणा वाटतो.








