नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरात एकाचा शेतजमिनीचे वाद सुरू असताना पोलीसात तक्रार दिली म्हणून वृंदावन सोसायटीमधील प्लॉट क्रमांक दोन जवळ दोघांनी येत दोन दुचाकी वाहनांवर पेट्रोलचे बोळे टाकीत आग लावली . तसेच घरात पेट्रोलचे बोळे फेकत जिवंत जाळण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार येथे शेतजमिनीचे वाद सुरू असताना भटाभाई शंकर पटेल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली याचा राग येऊन देवेंद्र जैन, बंटी पाटील व नवनाथ मराठे यांनी दोघांना वृंदावन सोसायटीच्या प्लॉट क्र . दोन मध्ये पाठवले . तसेच त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी ( एमएच -३ ९ , के -५८०६ ) व ( एमएच -३ ९ , के – ९ ४५५ ) या दोन्ही वाहनांवर पेट्रोल ओतून आगपेटीने सरळ आग लावली . या आगीत मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे . तसेच आगीचे पेट्रोलचे बोळे घरात टाकून भटाभाई शंकर पटेल यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला . ही घटना ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर तर पहाटेच्या दरम्यान घडली . याप्रकरणी भटाभाई शंकर पटेल यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात देवेंद्र चंदनमल जैन , बंटी पाटील , नवनाथ मराठे व अज्ञात दोन जणांविरुद्ध विरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत.








