नवापूर l प्रतिनिधी
नवापूर ते भवरे रस्त्यावर वनविभागाचे पथक गस्त घालत असताना मोटार सायकल वरून साग चौपाट वाहतूक करणाऱ्याने चौपाट टाकून पसार झाला. वनविभागाने २० हजाराचे चौपाट जप्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक नंदुबार प्रा. व वन्यजीव रेंज स्टॉप नवापूर व वनरक्षक पानबारा सह सरकारी व खाजगी वाहनाने नवापूर ते भवरे रस्त्याने पेट्रोलिंग करताना अज्ञात इसम मोटार सायकल वरून साग चौपाट वाहतूक करताना दिसला.त्याचा पाठलाग केला असता सदर इसमाने साग चौपाट फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.यावेळी साग चौपाट नग 6 जप्त करून विक्री आगार नवापूर येथे पावतिने जमा केले. जप्त मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 20 हजार रुपये आहे. सदर कारवाहीत धनंजय पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, ए. एम. शेख वनपाल बोरझर, वनरक्षक दीपक पाटील संतोष गायकवाड, विकास शिंदे, रामदास पावरा, लक्ष्मण पवार , अनिल वळवी, वाहन चालक साहेबराव तुंगार यांनी सहभाग घेतला.








