Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला आयोगातर्फे 10 फेब्रुवारी रोजी नंदुरबारला जनसुनावणीचे आयोजन

team by team
February 4, 2022
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांचे म्हणणे मांडण्याकरीता ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, सदस्या श्रीमती उत्कर्षा रुपवते, श्रीमती.दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवार 10 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात महिलांच्या तक्रारींवर जनसुनावणीचे आयेाजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीत जिल्ह्यातील सर्व तक्रारदार, पीडित महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरुपात घेवून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.
सदर जनसुनावणीस तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी कोणत्याही पीडित महिला पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकतील. तसेच पोलिस विभागाकडील महिला व मुलांकरीता असलेल्या सहाय्य कक्षाकडे प्राप्त असलेली प्रकरणेही सदर जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहेत. जनसुनावणीत विधीसेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी, पोलिस विभागाकडून तत्काळ सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक 02564-210047 ) येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

अभाविपच्या ५६ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे पोस्टर अनावरण, नंदूरबार येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान अधिवेशनाचे आयोजन

Next Post

नंदुरबार पोलीसांची अशीही माणुसकी: कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह पळवलेली रक्कम पोलिस कर्मचाऱ्यांनी जमा करीत केली परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add