नंदुरबार l प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष सन 2021-2022 साठी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नंदुरबार येथे वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अद्यापही पुर्णक्षमतेने प्रवेश न झाल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय, आय.टी.आय व डिप्लोमा प्रवेशित कोणत्याही वर्गात शिकत असलेल्या अनुसूचित जाती, अनाथ, दिव्यांग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता गृहपाल, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नंदुरबार येथे मूळ कागदपत्रासह उपस्थित राहुन प्रवेश घ्यावा. असे आवाहन गृहपाल गणेश देवरे यांनी केले आहे.