नंदुरबार l प्रतिनिधी
मानाचा व नवसाला पावणारा जागृत श्री काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठा मंत्र उपचार तसेच गणेश याग महापूजा होईल
शहरातील देसाईपुरा भागातील श्री काका गणपती मंडळातर्फे अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी मंडळातर्फे पंचधातू मिश्रित सोन्याचा मुलामा असलेली आकर्षक गणेश मूर्ती नंदनगरीत दाखल झाली आहे. मूषकासह सुमारे 380 किलो मूर्तीचे वजन असून आग्रा येथील अलिगड मूर्ती कार्यशाळेतून तयार करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी जल अधिवासाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. बुधवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता धान्य अधिवास होईल .गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येईल. शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती निमित्त चल प्राणप्रतिष्ठा मंत्र उपचार तसेच गणेश याग महायज्ञ सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रम होईल .तसेच सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप होईल. उत्तर प्रदेशातून गणेश मूर्तीचे नंदुरबारात आगमन झाले असून मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी संतोष (महाराज ) मधुकर देवळालीकर यांनी आपल्या मात्या -पित्यांच्या स्मरणार्थ श्री काका गणपती मंडळास एक लाख 21 हजार एकशे अकरा रुपयाची भरीव देणगी दिली आहे. दरम्यान कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री काका गणपती मंडळाचे सर्व कार्यकारणी सदस्य परिश्रम घेत आहेत .