तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे गावठी हातभट्टी दारू विनापरमिट कब्जात बाळगुण विक्री करतांना आढळून आल्याने तीन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करीत 140 लिटर 5 हजार 600 रु किंमती गावठी दारू जप्त केली. तिघांविरुद्ध प्रोव्हिशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांना दिलेली माहिती अशी कि, तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे कांतीलाल पोहल्या पाडवी यांच्या 60 लिटर 2400 रु किमतीची हातभट्टी दारू कब्जात विना परमिट बाळगतांना मिळून आली दुसऱ्या ठिकाणी आमलाड येथे भामटीबाई रघुनाथ ठाकरे यांच्या जवळ 40 लिटर 1600 रु किमतीची गावठी हातभट्टी दारू विनापास परमिट शिवाय कब्जात बाळगतांना मिळून आल्या तिसऱ्या ठिकाणी शेलवाई येथे शंकर गेमु पाडवी हा 40 लिटर 1600 रु किमतीची गावठी हातभटी दारू विना पास परमिट शिवाय कब्जात बाळगतांना व विक्री करतांना मिळून आला तळोदा पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध प्रोव्हिशन चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील चौकशी पो.ह. गोवर्धन वसावे, पो.ह. दिलीप सावळे, पो.हे.कॉ. वनसिंग पाडवी हे करीत आहेत या कारवाईमुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यात खळबळ उडाली आहे.