नंदूरबार l प्रतिनिधी
काँग्रेस सेवा दलाच्या नंदुरबार जिल्हा संघटकपदी दत्तुु बुलाखी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने जिल्हा संघटक पदाची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नंदुरबार येथील गुजर न्हावी समाजाचे माजी विभागीय अध्यक्ष व राहुल गांधी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तु बुलाखी पवार यांची काँग्रेस सेवा दलाच्या नंदुरबार जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा खा.सोनिया गांधी, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती झाली. नंदुरबार येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांच्या हस्ते दत्तु पवार यांना काँग्रेस सेवा दलाचे नंदुरबार जिल्हा संघटक पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष व प्रभारी जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, पालघर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, किसान काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा प्रभारी युवराज पाटील, काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष राजाराम बोरसे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.अशोक पाटील, किसान काँग्रेसचे देवा चौधरी, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मकसूद खाटीक, किसान काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील, बळवंत गावित, माजी नगरसेवक ईकबाल खाटीक, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष प्रविण लोहार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कार्यालयात किसान काँग्रेसची डिजीटल सभासद नोंदणी कार्यक्रम झाला.








