नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयजवळ धावत्या मोटर सायकल ला आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर उपजिल्हारुग्णालय समोर प्लस्टिक भंगार विकनाऱ्या मोटर सायकल स्वार स्त्यावरून जात असताना वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहन तेथेच उभे केले.आजू बाजूला असलेल्या नागरिकानी शासकीय रुग्णालयातून आग विझविण्याचे साधन आनल्याने तत्काळ आग विझली व पुढील अनर्थ टळला. दरम्यान मोटर सायकलच्या पेट्रोलच्या टाकी जवळ भडका असल्याने मोटरसायकलच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.