म्हसावद l प्रतिनिधी
महात्मा जोतीबा फुले युवा मंच ऑल इंडीयाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी यांचा जि.प.शाळा धांद्रे बु व खुर्द येथे संयुक्त आयोजित झालेल्या शिक्षण परिषदेत शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांद्रे खुर्द येथे शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख आर.बी. माळी, प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी होते. गेल्या काही वर्षांपासुन ईश्वर माळी यांनी ईतर सामाजिक कार्यांसोबतच नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात मोलाचे योगदान देवुन पर्यावरण समतोल राखण्यासाठी व दुष्काळाचे प्रमाण कमी होण्यासाठी हजारो वृक्षांची लागवड जनसमुदायाच्या साहाय्याने केली आहे. तसेच भविष्यातही नंदुरबार जिल्ह्यात वृक्षलागवड करण्याच्यादृष्टीने स्वतःच्या शेतात अकरा हजार रोपांची निर्मिती करत आहेत. तसेच पंचक्रोशीत नेहमी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे माळी यांनी कोरोना काळात जयनगर, धांद्रे उभादगड, निंभोरे येथील आदिवासी जनता भीतीमुळे लसिकरणासाठी पुढे येत नव्हते. त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे महत्वाचे काम ईश्वर माळी यांनी कोरोना काळात केले आहे. तसेच धांद्रे खुर्द व उभादगड या गावांना महसुली दर्जा मिळण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. तसेच या दोन आदिवासी गावाच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी पाठपुरावा करीत असतात. त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेत जयनगर केंद्रांतर्गत झालेल्या शिक्षण परिषदेत शिक्षक सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापिका जि.प .शाळा कहाटूळ छाया पाटील, मनोहर पाटील जि. प. प्राथमिक शाळा कोंढावळ, आय.डी माळी प्राचार्य श्री
चक्रधर माध्यमिक विद्यालय जयनगर, व्ही. व्हीं. पाटील प्राचार्य माध्यमिक शाळा कहाटूळ आदि शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी,हेमंत राजपूत, वाय. ए. पाटील, गोरख वाल्हे, विजय राजपूत व सर्व शाळांचे मुख्यध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जगताप यांनी केले.