Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ते निझर रस्त्यावर अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई , ४५ लाख रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह ४ जणांना अटक

team by team
January 28, 2022
in क्राईम
0
नंदुरबार ते निझर रस्त्यावर अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई , ४५ लाख रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह ४ जणांना अटक
नंदुरबार | प्रतिनिधी
निझर ते नंदुरबार रस्त्यावरील धमडाई फाटयाजवळ विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई , ४५ लाख २० हजार रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह ४ जणांना अटक केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांना दि.२६ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फ बातमी मिळाली की , दि.२७ जानेवारी रोजी सकाळी गुजरात राज्यातील निझर येथुन नंदुरबार मार्गे दोन पिकअप वाहनांमध्ये विमल गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक डॉ .बी.जी. शेखर पाटील यांनी तात्काळ आपले विशेष पोलीस पथकाला सदरची माहिती देवून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते . मिळालेल्या खात्रीशिर बातमीच्या आधारे विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बापु रोहम यांनी स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबारचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मदतीने अत्यंत गोपनीयता पाळत दि.२६ जानेवारी रोजी रात्री नंदुरबार येथे निझर ते नंदुरबार मार्गावर धमडाई फाटया जवळील सुष्टी हॉटेल समोर सापळा रचला . गुजरात राज्यातील निझर येथुन नंदुरबारकडे दिशेने येणार्‍या वाहनांची तपासणी करीत असतांना दिन.२७ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेचे सुमारास गुजरात राज्यातील निझरकडुन नंदुरबारच्या दिशेने दोन पिकअप वाहन वेगाने येतांना दिसुन आल्याने विशेष पथकातील अमंलदारांनी त्यांना हातातील बॅटरीच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला. परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेले म्हणुन पोलीसांची खात्री झाल्याने सदर दोन्ही वाहनांचा पाठलाग करुन शिताफीने दोन्ही वाहनांना थांबविले असता गाडी (क्र . एम.एच- ३९, सी.९२८९) वरील वाहन चालक हा वाहन तेथेच सोडुन पळुन गेला . तसेच वाहन (क्र.एम.एच – ४८ Aए.वाय – ६३२०) हिच्यावरील वाहन चालकास पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले व छोटु रमेश भिर्ले रा . हेकडवाडी ता . जि . धुळे यास गाडीमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यामुळे पोलीसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे व पांढर्‍या रंगाचे  प्लास्टीकचे पोते दिसली . ती उघडुन पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा मिळुन आला . आरोपीतास सदरचा विमल गुटखा बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुजरात मधील निझर येथुन धर्मेश घनश्यामदास हासानी रा . नंदुरबार याच्याकडुन विकत घेवून धुळे येथील राहणारे विक्की महादेव परदेशी रा . धुळे, एकनाथ ( बाळू ) भालचंद्र पाटील रा . धुळे यांनी घेतल्याची माहिती दिली . ताब्यात घेण्यात आलेल्या पिकअप वाहन (क्र . एम.एच- ३९, सी.९२८९) यात  १ लाख १८ हजार ८००  रुपये . कि . विमल पान मसाला लिहलेले एकुण ६०० पाकीटे , १३ हजार २००  रु . कि . वि १ तंम्बाकू नाव लिहलेले ६०० तंम्बाकू चे पाकीटे . १३ लाख ८३ हजार ८००  रु . कि . विमल पान मसाला लिहलेले एकुण ७ हजार ४०० रु . कि . २ लाख ४४ हजार २००  रु . कि . वि १ तम्बाकू नाव लिहलेले ७,४०० तंम्बाकू चे पाकीटे व ५ लाख रु . किंमतीचे वाहन असा एकुण १७ लाख ६० हजार  रु.किं.चा मुद्देमाल व पिकअप वाहन (क्र.एम.एच – ४८ Aए.वाय – ६३२०)  यात  १४ लाख ९६ रु . कि . विमल पान मसाला लिहलेले एकुण ८ हजार पाकीटे.२ लाख ६४  रु . कि . वि .१ तंम्बाकू नाव लिहलेले ८ हजार तंम्बाकू चे पाकीटे व ५ हजार रु.किं.चे पिकअप वाहन (क्र.एम.एच -४८ ए.वाय – ६३२०) असा एकुण १७ लाख ६० हजार असा दोन्ही वाहनातील मुद्देमाल वाहनासह ४५ लाख २० हजार रु . किं . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .याप्रकरणी चालक छोटु रमेश भिल रा . हेकडवाडी ता . जि . धुळे व पिक अप वाहन (क्र . एम.एच- ३९, सी.९२८९) हिच्यावरील वाहन चालक शाहरूख पुर्ण नाव गाव माहित नाही , धर्मेश घनश्यामदास हासानी रा . नंदुरबार , विक्की महादेव परदेशी रा . धुळे , एकनाथ ( बाळू ) भालचंद्र पाटील रा . धुळे यांच्याविरुध्द् उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी  वाहन चालक चालक छोटु रमेश भिल रा . हेकडवाडी ता . जि . धुळे यास अटक करण्यात आलेली आहे . तसेच गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपींबाबत माहिती घेतली असता विक्की महादेव परदेशी रा . धुळे , एकनाथ ( बाळू ) भालचंद्र पाटील रा . धुळे यांची माहिती काढली असता विक्की महादेव परदेशी रा . धुळे, एकनाथ ( बाळू ) भालचंद्र पाटील रा . धुळे  वाहन चालक शाहरुख रा . धुळे हे शिर्डी जि . अहमदनगर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती . त्याअनुषंगाने विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक बापु रोहम , सहा . पोलीस निरीक्षक  सचिन जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर या दोन्ही पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदारांनी आपसात समन्वय साधुन एकनाथ भालचंद्र पाटील रा . नंदाकी बुद्रुक ता . जि . धुळे, विकी महादेश परदेशी रा . गल्ली नंबर -६ , चैनी रोड , धुळे ता . जि . धुळे, पिक अप वाहन(क्र . एम.एच- ३९, सी.९२८९) हिचेवरील वाहन चालक शाहरुख अयुब शेख रा . चितोड़ ग्राम पंचायत जवळ , हनुमान मंदीराचे बाजुला धुळे यांना शिर्डी जि . अहमदनगर येथुन शिताफीने ताब्यात घेवून नंदुरबार येथे आणण्यात आले व त्यांच्या विरुध्द् पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे . गुन्ह्याचा पुढील तपास  विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक डॉ .  बी.जी. शेखर पाटील यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे करीत आहेत . तसेच फरार आरोपी धर्मेश घनश्यामदास हासानी रा . नंदुरबार याचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यास ताब्यात घेवून आणखीन आरोपी आहेत का ? याबाबत तपास करण्यात येईल .  सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक डॉ . बी.जी. शेखर पाटील , पोलीस अधिक्षक  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक  विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक बापु रोहम , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक  संदीप पाटील , विशेष पोलीस पथकातील सहा . पोलीस निरीक्षक सचिन जाधव , असई बशिर तडवी , पोह सचिन धारणकर , रामचंद्र बोरसे , पोना प्रमोद मंडलीक , कुणाल मराठे , मनोज दुसाणे , सुरेश टोगारे व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोह दिपक गोरे , रमेश पाडवी , पोना  राकेश मोरे , पुरुषोत्तमः सोनार , पोलीस अमंलदार विजय ढिवरे , अभिमन्यु गावीत , दिपक न्हावी , अभय राजपुत , आनंदा मराठे यांनी केली असुन विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सानुग्रह अनुदान नामंजूर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीकडे अपील करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी, नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ६१ लाखाचे वीजबिल थकले

Next Post
कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी, नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ६१ लाखाचे  वीजबिल थकले

कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी, नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ६१ लाखाचे वीजबिल थकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add