Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सानुग्रह अनुदान नामंजूर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीकडे अपील करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

team by team
January 28, 2022
in आरोग्य
0
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणामुळे नामंजूर झाले असल्यास अशा प्रकरणासंदर्भात नातेवाईकानी अपील करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
कोविड-19’ मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य वितरीत करण्याबाबत mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह साहाय्य प्राप्त होण्याकामी ऑनालाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले असल्यास अशा सर्व प्रकरणांबाबत अर्जदाराची सानुग्रह साहाय्य मिळण्याची संधी कायम राहील. मात्र, त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत.
यापूर्वी ऑनलाईन केलेले अर्ज काही कारणामुळे नामंजूर झाले असल्यास, अशा अर्जाबाबत पुढील कार्यवाही करीता अर्जदाराने शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर भेट दिल्यास अर्जदारास Appeal to GRC अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा यापूर्वीच भरलेला अर्ज योग्य आणि विश्वसनीय आहे. असे वाटत असल्यास प्रकरणाच्या फेरतपासणीकरीता अर्जदाराने संकेतस्थळावरील Appeal to GRC या संदेशावर क्लिक करुन GRC (तक्रार निवारण समिती) कडे अपील करावे. Appeal to GRC यावर क्लिक केल्यानंतर लागलीच निवेदन ऑनलाईन तक्रार निवारण समितीकडे सादर झाल्याचा संदेश पोर्टलवर दिसेल.
सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार तक्रार निवारण समितीकडे असे प्राप्त अपील प्रकरणे समक्ष सुनावणीसाठी संधी दिली जाईल. याबाबत अर्ज करताना पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या संदेशात तक्रार निवारण समितीकडे समक्ष उपस्थित राहावयाची तारीख, वेळ व स्थळ नमूद असेल. त्यावेळी अर्जदारांना आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रांसह तक्रार निवारण समितीकडे समक्ष, सोबत, जबाबदार प्रतिनिधींनी उपस्थित राहावे.
तक्रार निवारण समिती अर्जदाराचा अर्ज क्रमांक Scrutiny Tab मधून शोधून अपलोड केलेल्या व अर्जदाराने सोबत आणलेल्या मूळ सर्व कागदपत्रांची तपासणी करुन पुढील अर्ज मंजूर करणे अथवा नामंजूर करण्याचा योग्य तो निर्णय घेतील. तक्रार निवारण समितीद्वारे तपासणी अंती मंजूर केलेले सर्व अर्ज अंतिम मंजुरीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविले जातील.
अर्जदाराच्या खात्यावर पैसे पाठविण्याची पुढील कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल. या सर्व बाबत अर्जदारास त्याच्या अर्ज पोर्टलवर आणि त्यांने नोंदविलेल्या मोबाईल कमांकावर संदेश प्राप्त होतील. कोणत्याही अर्जदारांनी लेखी अर्ज करु नये. अशा प्राप्त अर्जावर कोणतीही कार्यवाही होणार नाही. खोटी कागदपत्रे तयार करणे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देणे, दुबार सानुग्रह अनुदानासाठी प्रयत्न करणे ह्या बाबी फौजदारी स्वरूपाच्या असल्याने त्या दंडनीय असल्याने, असा प्रयत्न करणारा व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी वैयक्तिक व गटांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार ते निझर रस्त्यावर अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई , ४५ लाख रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह ४ जणांना अटक

Next Post
नंदुरबार ते निझर रस्त्यावर अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई , ४५ लाख रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह ४ जणांना अटक

नंदुरबार ते निझर रस्त्यावर अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई , ४५ लाख रुपये किंमतीचा विमल गुटख्यासह ४ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add