नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील कृषि तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पं.स.उपसभापती कमलेश महाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमर्दे खुर्द येथील सरपंच अरविंद ठाकरे हे होते. तर शिवसेनेचे लक्ष्मण बांगर, देवेंद्र आघाव, तलाठी किरण सुर्यवंशी, रामेश्वर पाटील, रविंद्र सावळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती जयस्वाल , श्रीमती माळी, गौरव जगताप आदींनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य के.जी.मराठे यांनी मानले.








