नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश विक्रम पाटील हे होते. तसेच मा.उपसरपंच अशोक संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सैनिक देवीदास पाटील , उपसरपंच भालेर गजानन पाटील , वि.का.सोसायटीचे चेअरमन कन्हीलाल पाटील, नगावचे नानाभाऊ पाटील, तुकाराम पाटील,अशोक पाटील, भिकन पाटील, जिजाबराव पाटील, हिंमत पाटील, आनंदा पवार, निलेश पाटील सैनिक तिसी, चुनीलाल पाटील, किशोर पाटील,जिजाबराव पाटील, पी. के. पाटील, अनिल पाटील आदी ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.एम.मंसुरी तर सूत्रसंचालन पर्यवेक्षक व्हीं.जे.पाटील यांनी केले.तसेच जे जी सोलंकी यांनी संविधान वाचन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.








