म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचा वतीने,लोणखेडा ग्रामस्थ व तरुणांच्या साक्षीने चार रस्ता येथे प्रजासत्ताक दिनी भारत माता प्रतिमा पूजन संपन्न झाले.
या वेळी अशोक पाटील, माजी उपसरपंच युवराज पाटील, पोलीस पाटील,राष्ट्रीय विश्वगामी समाजसेवा संघाचे सदस्य बापू सोनार,राष्ट्रीय विश्वगामी समाजसेवा संघाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाठक तसेच तालुका कार्यवाहक, तालुका प्रचारक व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.तसेच सरदार वल्लभ भाई पटेल साप्ताहिक मिलन शाखाचे स्वयंसेवी संघ कार्यवाहक ऋषी सुनील पाटील व उपकार्यवाहक तुषार राजाराम पाटील आणि स्वयंसेवी संघचे विवेक भरत पाटील, नयन पाटील, कुणाल पाटील, चिराग पाटील, कार्तिक पाटील, गौरव पाटील, दौलत पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, किरण पाथरवट, अशोक पाटील, बटू पाटील, नागराज पगारे, आनंदा पाटील, शरद सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषी पाटील यांनी केले. तर आभार तुषार पाटील यांनी आभार मानले.