नंदूरबार l प्रतिनिधी
दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती शाखा नंदुरबारच्या महिला कार्यकर्त्यां कडून गिरीविहार गेट येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या श्रमिक महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भगिनींना वाण म्हणून भारत मातेची प्रतिमा तसेच मास्क देण्यात आले यावेळी जनकल्याण समितीच्या उपाध्यक्ष सौ. प्रितीताई बडगुजर यांच्यासह समितीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.