नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातलं दुर्गम भागातील बालाघाट येथील आदिवासी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल मानसिंग वसावे हे दक्षिण अमेरिकेतील माउंट एकांकगुआ या शिखरावर चढाईसाठी निघाले आहेत.त्यापूर्वी त्यांनी आज माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्प उने ३० अंश सेल्सियस तापमानात मोहीम फत्ते केली.
टीम ३६०एक्सप्लोरचा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी अवघड परिस्थिती मध्ये काला पत्थर (18.192 फूट) उंच शिखर व एवरेस्ट बेस कँप (17,598) या शिखरवर आज यशस्वी चडाई करून अभिमान वाटेल अशी कामगिरी करून कोराना काळात मृत्यू पावलेल्या भारतीयांना अर्पण केली.त्यांनी सराव व मोहिम राबविण्यात आली. दि. 19 जानेवारी पासुन लुक्ला येथून मोहीमेला सुरुवात केली. जवळ जवळ 71 किमी आणि उणे वातावरण हे ७ पासुन १४ ते उणे 30 पर्यंत होते. बर्फ पडत होता, वारे हे प्रचंड वेगाने होते या सगळ्या गोष्टी सहन करत मोहीम यशस्वी व्हावी हा योगायोग असा की मागच्या वर्षी अनिल ची मोहिम ही आफ्रिका खंडातील सर्वात ऊंच शिखर वर होती आणि परत हा योग चालून आला.याचे सगळे श्रये हे गुरु आनंद बनसोडे यांचे आहे मी केवळ -केवळ समाज बांधवांचं सहकार्याने पुढील वाटचालीस यशस्वी प्राप्त होतोय, मनःपूर्वक सर्वांचे आभार व सर्वांना धन्यवाद देतो, असेच मला सहकार्य अपेक्षित आहे असे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी पब्लिक मिरर शी बोलताना सांगितले.