Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार-ऍड.के.सी.पाडवी

Mahesh Patil by Mahesh Patil
July 19, 2021
in राज्य
0
आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार-ऍड.के.सी.पाडवी

नंदुरबार | प्रतिनिधी
आदिवासी बांधवांना स्थानिक स्तरावर  रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने शेळी व कुक्कुटपालनासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल,  असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारतर्फे राजपूत लॉन्स येथे आयोजित खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला  जि.प.अध्यक्षा ऍड. सीमा वळवी,  जिल्हाधिकारी मनीषा खत्री,   सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, दिलीप नाईक, गोवाल पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी आदी उपस्थित होते. ऍड. पाडवी म्हणाले,  आदिवासी भागातील स्थलांतर थांबविण्यासाठी या भागाचा विकास होणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतर रोखता येऊन जीवनमानात सुधारणा घडवून आणता येईल. आमचुरसारख्या स्थानिक नैसर्गिक उत्पादनांवर प्रक्रीया करून रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. त्यादृष्टीने शेळी आणि कुक्कुट पालनास प्रोत्साहन देण्यात येईल.    आदिवासी बांधवांसाठी पूर्वी खावटी कर्ज योजना राबविली जात असे. कोरोना काळात ही योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. खावटी योजनेअंतर्गत राज्यातील १२ लाख कुटुंबाना लाभ देण्यात येणार आहे. सुमारे १० लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २००० रुपये जमा करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन अनुदान मिळाल्याची खात्री करून घ्यावी. काही नागरिक रोजगारानिमित्त बाहेर असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांचा समावेशदेखील करण्यात येणार आहे.  यावर्षी त्यासाठी तरतूद करण्यात येईल.  दुसर्‍या टप्प्यात खावटी कीटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. यात ११ प्रकारच्या वस्तू आणि खाद्यतेल आहे. खावटी किटमधील वस्तूंचा दर्जा चांगला ठेवण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. गरीब आदिवासी बांधवाना खराब वस्तूंचे वाटप झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.श्रीमती वळवी म्हणाल्या, कोरोनाकाळात गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेल्या अनेक आदिवासी बांधवांचे रोजगार गेलेत. त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहेत. भूमिहीन, विधवा महिलांना ही योजना अधिक दिलासा देणारी आहे. पालकमंत्री पाडवी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. कोरोना काळात आरोग्य सुविधांचा चांगला विकास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. नाईक यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार यांनी खावटी अनुदान योजनेची माहिती दिली. नंदुरबार प्रकल्पांतर्गत  ७१ हजार २१५  अनुसूचित जमातीच्या नागरिकांचे  अर्ज भरून घेण्यात आले. त्यापैकी ६३ हजार २२७  लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यातील २००० रूपयेप्रमाणे अनुदान जमा करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.पालकमंत्री ऍड. पाडवी यांच्या हस्ते होळ तर्फे हवेली येथील १११, दहिन्दुले खु. ७७, दहिन्दुले बु. ११० आणि पातोंडा गावातील १६४ अशा एकूण ४६२ लाभार्थ्यांना  प्रातिनिधीक स्वरुपात खावटी कीटचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव येथे युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपासमोर अंदोलन करून केंद्र सरकार केला निषेध

Next Post

अतितिव्र कुपोषित बालकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्या-ऍड.के.सी.पाडवी

Next Post
अतितिव्र कुपोषित बालकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्या-ऍड.के.सी.पाडवी

अतितिव्र कुपोषित बालकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्या-ऍड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025
‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

April 28, 2025
भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

April 28, 2025
चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

April 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group