म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील स्वातंत्र स्मारक चौक (चावडी चौक) येथे 73वा भारतीय प्रजासत्ताक दिन भारतमाता प्रतिमा पूजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी माजी नगरसेवक समाजाचे ज्येष्ठ नागरिक विनोद सोनार, सुदाम सोनार,भाजपा शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, अटल बिहारी वाजपेयी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी, सराफ असोशिएनचे अध्यक्ष अल्पेश सोनार यांनी देखील प्रतिमा पूजन व माल्यार्पण केले. याप्रसंगी भारत मातेचा जयजयकार करण्यात आला.प्रा अनिल सोलंकी, अरविंद कुवर, संतोष सोनार, सोमेश्वर सोनार, अमित सोनार , सोमेश्वर सोनार,
अमित महेंद्र सोनार, मीननाथ सोनार,मनोज सोनार,डॉ. हेमंत सोनी,नेत्रदीपक कुवर, प्रितेश सराफ, अमोल सोनार, रुपेश सोनार,भिक्कन शिंदे आणि सुवर्णकार समाज कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण केले.स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सवी वर्ष असल्याने या प्रसंगी मिठाई वाटप करण्यात आले.