म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलतानपुर दरा फाटा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना अक्षरशा वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे व जिव मुठीत धरुन कसेबसे वाहन चालवावे लागते चारचाकीतर सोडाच परंतु दुचाकी वाहन चालवणे सुध्दा जिकरीचे झाले आहे.
हा रस्ता ग्रामीण भागातिल आहे. परंतु म्हसावदहुन खेतिया मध्यप्रदेश सिमेला जोडला गेलेला आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक विभागाकडुन जानिव पूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे.तरी सार्वजनिक विभागाकडुन वेळीच दखल घेण्यात यावी व लवकरात लवकर हा रस्ता काँक्रिटी करून शेतकरी व वाहन चालकांचा जिव वाचवावा जर उशीर केला तर याला संपूर्ण जवाबदार सार्वजनिक विभागच राहिल तरी या रस्त्याची दखल घेऊन लवकरात लवकर काम झाले पाहिजे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका संघटक प्रमुख पांडुरंग पाटील सुलतानपुर यांनी दिला आहे.