नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथील जि. प. शाळेत 79 विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

जि. प. शाळा विरपूर ता. अक्कलकुवा. येथे अक्कलकुवा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर. आर. देसले. यांच्या मार्गदर्शनाने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत, इ 1ली ते इ. 4 थी पर्यंतच्या एकूण 79 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला वाण्याविहिर केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन बिस्नारिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र तडवी, सदस्य सुभाष तडवी, निताबाई तडवी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. ललिता पाटील , सहशिक्षक जगदीश धसे, दिलवरसिंग पाडवी आदी उपस्थित होते.








