नंदुरबार l प्रतिनिधी
नवापुर पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात साखर वाहून नेणाऱ्या मालवाहू ट्रकचा अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रकचे दोन भाग झाले आहे.या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून लोखंडी पत्रात पाय अडकल्याने क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. तर सहचालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापुर पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात साखर वाहून नेणाऱ्या मालवाहू ट्रकचा आज सकाळी अपघात झाला. भीषण अपघातात ट्रकचे दोन भाग झाले आहे.या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून लोखंडी पत्रात पाय अडकल्याने क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. तर सहचालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.यावेळी बोरझर स्थानिक नागरिक व नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तेथे मदतकार्य केले.सदर ट्रक ताराबाद हुन साखर घेऊन आमदाबाद कडे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घाट रस्त्यात तीव्र उतारावरून खाली येतांना एक्सेल बेरिंग तुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.








