नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मात्र काल दिवसभरात तब्बल ४३६ जण कोरोना मुक्त झाल्याने घरी परतले आहेत. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काल दिवसभरात १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात दररोज सुमारे २५० ते ३०० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. काल दिवसभरात तब्बल ४३६ जण बरे झाले आहेत. यामध्ये नंदुरबार शहरासह तालुक्यातील २१३, शहादा १०२, तळोदा २४, नवापूरातील ७२, अक्कलकुवा २४ तर धडगावातील एक जण बरे झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे. दरम्यान, काल दिवसभरात१७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नंदुरबारातील ७४, शहादा ६९, नवापूर २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे अडीच हजार ॲक्टीव रुग्ण असून यातील ३४ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच उपचार घेत आहेत.








