Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

team by team
July 19, 2021
in राजकीय
0
ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

नंदुरबार ! प्रतिनिधी
केंद्राच्या आडमुठेपणामुळे राज्यात ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले आहे. नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने मागितलेला इम्पिरियल डाटा केंद्र सरकारने सादर न केल्यास एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा कॉँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.यासह दि.९ ऑगस्ट रोजी राज्यात ओबीसी बचावो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
नंदुरबार येथे कॉँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, कॉँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सहकार्याध्यक्ष सुभाष पाटील, कॉँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष योगेश चौधरी, राजेश रघुवंशी, जि.प.सदस्य देवमन पवार, पंडीत मराठे आदी उपस्थित होते. यापुढे बोलतांना भानुदास माळी म्हणाले की, राज्यात ओबीसी, दलीत, भटके समाज हक्कासाठी आक्रमक झाला आहे. भाजपाने कॉँग्रेसच्या नेत्यांमध्ये विषारी विचार पेरुन लुबाडले. आता कॉँग्रेसने निर्माण केलेल्या संस्था विकण्याचा डाव भाजपाचा दिसून येत आहे. ओबीसींचे नोकर्‍यांमध्ये, राजकीय आरक्षण संपले आहे. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी आरक्षणासंदर्भातील इम्पिरियल डाटा न्यायालयात सादर केला नाही तर एक लाखाच्या संख्येने कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. यापुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेला कायदा हा शेतकरी विरोधी आहे. न्याय व्यवस्थेवर बंधन आल्याची शंका अनेकदा उपस्थित करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था भांडवलदारांना विकली गेली असल्याचा आरोप माळी यांनी केला. तसेच दि.९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी देखील आंदोलन छेडणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथून नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

Next Post

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Next Post
कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add