Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथील तापीनदी पुलावर स्टंट करणाऱ्या ट्रॅक्टरचालका विरूद्ध पोलीसांनी केला गुन्हा दाखल

team by team
January 25, 2022
in क्राईम
0
प्रकाशा येथील तापीनदी पुलावर स्टंट करणाऱ्या ट्रॅक्टरचालका विरूद्ध पोलीसांनी केला गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार ते प्रकाशा रस्त्यावरील तापी नदी पुलावर दि. २० रोजी ट्रॅक्टरचे दोन्ही चाके वर उचकावून स्टंट करणाऱ्या एकाविरूद्ध अखेर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
नंदूरबार ते प्रकाशा रस्त्यावरील तापी नदी पुलावर दि. २० रोजी ऊसाने भरलेली ट्रॅक्टरट्रॉली (क्र.एम.एच.१८ झेड ९५९०) घेवून जात होता. यावेळी त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने हायड्रोलिकचा पाटा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या दांड्याला लावल्यामुळे ट्रॅक्टरचे पुढील दोन्ही चाके वर उचकावून स्टंट केला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करुन वाहतूकीची कोंडी करीत धोकेदायक पद्धतीने ट्रॅक्टर चालवितांना आढळून आला. चालकाच्या या स्टंटमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तसेच ट्रॅक्टर नदीत कोसळून अथवा बाजूला कोसळून अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली होती. त्यातच ट्रॅक्टर चालक स्टंट करत असल्याने अनेक वाहने पुलावरच थांबल्याने काही वेळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, सदर ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती देणाऱ्यास शहादा पोलिसांकडून बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दि. २३ रोजी ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेवून पोहेकॉ. रामा वळवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथील राहूल संपत डोंगरे याच्याविरूद्ध भादंवि कलम २७९ सह मोटार वाहन कायदा कलम २२९, १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि.२५ रोजी जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता

Next Post

दिलासादायक : नंदुरबार जिल्ह्यात ४३६ जण कोरोना मुक्त,१७१ जण आढळले पॉझिटिव्ह

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात ७२ तासात आढळले १ हजार २३३ कोरोना रूग्ण

दिलासादायक : नंदुरबार जिल्ह्यात ४३६ जण कोरोना मुक्त,१७१ जण आढळले पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add