नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे वातावरणात गारठा वाढला असून थंडीची लाट आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दि.२५ रोजी जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काळात नागरिकांनी आपल्या जनावराची काळजी कशी घ्यावी,काय करावे काय करु नये याबाबत मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे. काल नंदुरबार येथे ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे सचिन फड यांनी सांगितले. आज दि.२५ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे. आज गारठा आणखीनच वाढण्याची शक्यता असून याचा मानवी आरोग्यावर परिणाम होणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातर्फे मिळालेल्या माहितीनूसार, दि.२८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात थंडी कायम असणार असून त्यानंतर काहीसा तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाल्यावर गारठा कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शीतलहरीचा प्रभाव कमी करण्यासाठी गरम कपडे तयार ठेवावेत, जास्तीत जास्त वेळ घरात राहावे.थंड वाराचा संपर्क टाळण्यासाठी प्रवास टाळावा. आजूबाजूचा परिसर कोरडा ठेवावा. अंगावरील कपडे ओले झाल्यास/भिजले असल्यास शरीराच्या उष्णतेचे नुकसान टाळण्यासाठी कपडे त्वरीत बदलावे. हातमोजे पेक्षा मिटन्सला प्राधान्य द्यावे, कारण की मिटन्स थंडी पासून सुरक्षित ठेवण्यास व हात उबदार ठेवण्यास जास्त उपयुक्त आहे. हवामानाच्या अद्ययावत माहितीसाठी रेडिओ, टि.व्ही व वर्तमानपत्रे वाचावीत.गरम पेय नियमितपणे घ्यावीत. वृध्द लोक आणि मुलांची काळजी घ्यावी. थंडीमुळे,दव बांधा झाल्याचे लक्षणांकडे लक्ष ठेवावेत जसे बोट, कानाची पाळे आणि नाकाचा शेंडा सुन्न व पांढऱ्या किंवा फिकट गुलाबी रंगाचे दिसल्यास.दव बांधामुळे प्रभावित झालेले भाग कोमट पाण्यात ठेवावात.शरीराचे तापमान कमी झाल्यास अशा व्यक्तीला उबदार ब्लॅकेट,गरम कपडे, चादर द्यावे.अशाने शरीर उबदार होते.शरीराचे तापमान वाढविण्यासाठी कोमट पेय द्यावे.स्थिती बिघडल्यास वैद्यकीय मदत घ्यावीत. याकाळात मद्यपान करु नये हे आपल्या शरीराचे तापमान कमी करते. गोठलेल्या भागाला मालिश करु नये,यामुळे अधिक नुकसान होऊ शकते.शरीर थरथर,कापत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये.
जर पिकांना थंडीचा बांधा झाली असेल तर अशा परिस्थितीत पीक वाचविण्याकरिता सायंकाळच्या वेळी हलके सिंचन करावे. फळ झाडांची रोपे किंवा छोटी झाडे वर सरकंडा, वाळलेल्या काड्या पेंढा, पॉलिथीन पत्रे,गोणपाट पोत्यांनी झाकून ठेवावीत.केळीचे गुच्छ पॉलिथीन पिशव्याने झाकुन ठेवावीत. रोपवाटिकेत नर्सरीचे बेड,वाफे रात्री पॉलिथीन शीटने झाकून ठेवावीत. मोहरी,राजमाह आणि हरभरा यासारख संवेदनशील पिकांना दवच्या झटक्यापासून वाचण्यासाठी 0.0 टक्के (1000 लिटर पाण्यात 1 लिटर एच.टू.एसओ फोर) किंवा थायोरिया 500 पीपीएम ची 1000 लिटर पाण्यात 500 ग्रॅम थिओरिया फवारणी करावी.थंड हवामानात वनस्पती, झाडांना खतांची मात्रा देवून नये,कारण त्यांच्या मुळांची कार्य क्षमता कमी होते.माती काढू नका,कारण सैल पृष्ठभाग खालच्या पृष्ठभागावरुन उष्णतेचे वहन कमी करते.
पशुसंवर्धन काय करावे
रात्री जनावरे गोठ्यात ठेवा आणि त्यांना थंडीपासून बचावासाठी कोरडी/उबदार जागा द्या.थंड स्थितीचा सामना करण्यासाठी व जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी आहारात पुरेसे प्रथिने आणि खनिजे द्या.हिवाळ्यात जनावरांच्या उर्जेची गरज भागविण्यासाठी नियमितपणे जनावरांना खारट मिश्रणासह मीठ व गव्हाचे धान्य,गूळ इत्यादी 10 ते 20 टक्के प्रमाणात प्रती दिवस द्या.कुक्कुटपालनात कोंबड्यांच्या शेडमध्ये कृत्रिम प्रकाश देऊन पिल्ले गरम ठेवा.हे करु नये सकाळच्या वेळी जनावरांना चारा देऊ नये.रात्रीच्या वेळी जनावरे उघड्यावर ठेवू नये.प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.








