नंदुरबार | प्रतिनिधी
औरंगाबाद शहरात हिंदुस्थानचे आराध्य दैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा स्थापनेला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केल्यामुळे समस्त हिंदु समाजाचा भावना दुखावल्या गेल्याने हिंदु सेवा सहाय्य समितीकडून जाहीर निषेध व्यक्त करून त्या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पुतळ्याचे एक कोटी रुपये ग्रामीण भागात शाळा उभारण्यास करा, पण पुतळा उभारायचे असेल तर माझा ठाम विरोध आहे, असं इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. हिंदुस्थानात वीर महापुरुष महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळाऐवजी मोगल आक्रमणकारी यांचे पुतळे उभारायचे का? असा संतप्त सवाल हिंदु समाज इम्तियाज जलील यांना विचारत आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, क्षत्रिय राणा राजपूत समाज समितीचे चेतन राजपूत आदींचा स्वाक्षरी आहेत.








