Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मित्रानेच केला मित्राचा घात : ढेकाटी – वाल्हेरी शिवारातील खूनाचा गुन्हा ४८ तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

team by team
January 24, 2022
in क्राईम
0
मित्रानेच केला मित्राचा घात : ढेकाटी – वाल्हेरी शिवारातील खूनाचा गुन्हा ४८ तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड
नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील ढेकाटी – वाल्हेरी शिवारात झालेला खूनाचा गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली असुन या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलल्या माहितीनुसार, दि.२२ जानेवारी रोजी सुरूपसिंग भोंग्या नाईक रा . ढेकाटी ता . तळोदा हे आपले दिवसभरातील शेतीचे काम संपवून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना त्यांना ढेकाटी वाल्हेरी शिवाराचे बांधावर नर्मदानगर पुनवर्सन क्र . १ येथील आटया पुजारा यांचे दादर पेरणी केलेल्या शेताच्या बांधावर लावलेल्या सागाचे झाडाजवळ एक मनुष्याचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पालथे पडलेले दिसले . मृत अवस्थेत पडलेल्या प्रेताचे कपडे व वर्णनावरून सुरूपसिंग भोंग्या नाईक यांना तो त्यांचा मुलगा राजु सुरूपसिंग नाईक हाच असल्याचे समजले . सुरूपसिंग भोंग्या नाईक यांनी तात्काळ घटनेची माहिती गावकर्‍यांना दिली स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्यान पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून शेताच्या बांधावर पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली. असता शर्ट पँट घातलेला एक पुरुष रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेला होता . तसेच मृत व्यक्तीच्या डोक्यावर जखमेच्या खूणा होत्या व कानातून रक्त येत होते . सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याने सदर बाबत मयताचे वडिल सुरूपसिंग भोंग्या नाईक यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला . घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार गुन्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या . घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे , मोबाईल , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार , अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्यामुळे सी.सी.टी.व्ही . तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती . त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमंलदारांचे वेगवेगळे ५ . पथके तयार करुन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली . सदर मयत इसमाचे मारेकरी कोण ? त्यास का मारण्यात आले ? मारण्याचा उद्देश काय ? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे उभे होते . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकांनी घटनास्थळाच्या आजु बाजुला असलेल्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील १० ते १५ गावे व पाड्यात विचारपुस करुन माहिती काढत होते , परंतु उपयुक्त अशी कोणतीही माहिती पथकांच्या हाती लागत नव्हती . दि.२३ जानेवारी रोजी गोपनीय बातमीदारांकडुन बातमी मिळाली की , मयत राजु सुरूपसिंग नाईक याचे दि.२२ जानेवारी  रोजी सरदारनगर ता . तळोदा येथील उदेसिंग ऊर्फ उद्या याच्याशी भांडण झाले होते व तेव्हापासुन तो त्याच्या राहत्या घरी व गावात दिसलेला नाही अशी त्रोटक माहिती मिळाली . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयीत आरोपी उदेसिंग कुशा वसावे याचे नेहमीचे येण्या जाण्याचे ठिकाण , मित्र , नातेवाईक यांचेकडे शोध घेतला तरी देखील संशयीत आरोपी मिळुन येत नव्हता . दि.२३ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी ढेकाटी वाल्हेरी गावाचे जंगलातील एका झोपडीत लपून बसलेला आहे.अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना झाले . परंतु रात्रीचा वेळ व अतिदुर्गम असा डोंगराळ भाग असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अनेक अडचणी येत होत्या . त्या अडचणींवर मात देत ढेकाटी वाल्हेरी गावाचे जंगलात एका ऊंच टेकडीवर एक झोपडी दिसली . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खबरदारी म्हणून झोपडीच्या आजुबाजूला सापळा रचुन झोपडीत झोपलेल्या इसमाला शिताफीने ताब्यात घेवून त्यास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव उदेसिंग कुशा वसावे रा . सरदारनगर ता . तळोदा असे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्यातील संशयीत आरोपीतास ताब्यात घेण्यात यश आले होते . आरोपीतास विचारपुस केली असता त्याने सराईत आरोपीताप्रमाणे उडवा उडवीची उत्तरे देवू लागला म्हणून त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आणुन विचारपुस करण्यात आली.परंतु संशयीत आरोपी काहीही सांगत नव्हता . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतास वेगवेगळ्या पध्दतीने विचारपुस करुन देखील आरोपी काही एक माहिती सांगत नव्हता म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांनी आरोपीताचा काही पूर्व इतिहास आहे का ? याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतावर सन २०१५ मध्ये तळोदा पोलीस ठाणे येथे घरफोडी सारखा मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा दाखल होता व त्यास त्यावेळी अटक होवून ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देखील झालेली होती , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . रविंद्र कळमकर यांना समजले होते की , गुन्ह्यातील संशयीत आरोपी उदेसिंग वसावे हा जेलमध्ये जावून आलेला असुन तो खरे बोलणार नाही , म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासाचे संपूर्ण काशल्य वापरून आरोपीतास बोलते केले व त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले . आरोपीताने सांगितलेली माहिती धक्कादायक होती . संशयीत आरोपी उदेसिंग कुशा वसावे व मयत राजु सुरुपसिंग नाईक हे दोन्ही मित्र होते व दि. २२ रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास त्यांच्यात दारुचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद होवून मारामारी झाली . त्यात संशयीत आरोपी उदेसिंग कुशा वसावे याने मयत राजु सुरुपसिंग नाईक याचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केले बाबत सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व अमंलदार यांनी तपासाचे परिपूर्ण कौशल्य वापरून गुन्ह्याची उकल केल्याने संशयीत आरोपी उदेसिंग कुशा वसावे यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तळोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . कुठल्याही प्रकारचा पुरावा , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार , तांत्रिक पुरावा , सी.सी.टी.व्ही कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्यातील आरोपीतास कौशल्यपूर्वक विचारपुस करुन आरोपीतास बोलते केले व गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे म्हणून पोलीस अधिक्षक  पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केलेले आहे . सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक  विजय पवार ,  उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक  संदीप पाटील , सहा . पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी , पोलीस नाईक सुनिल पाडवी , बापू बागुल पोलीस अमंलदार अभिमन्यु गावीत तसेच संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

आंदोलनापुर्वी पुतळा घेतला ताब्यात,नाना पटोलेंना अटक करा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची मागणी

Next Post

भाजपा आ.गोपीचंद पडळकर यांची भरत गावीत यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add