नवापूर l प्रतिनिधी
दैनिक नवापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंगेश येवले यांची नियुक्ती करण्यात आली.
दि 23 जानेवारी रोजी सायंकाळी दैनिक नवापूर तालुका पत्रकार संघाची सर्व साधारण सभा शासकीय विश्रामगृह येथे हेमंत पाटील यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली .
बैठकीत दैनिक पत्रकार संघाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. दिवंगत पत्रकार बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आगामी काळात नियमित उपक्रम राबविणे बाबत चर्चा करण्यात आली. या वेळी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली अध्यक्षपदी मंगेश येवले, सचिव महेंद्र जाधव, सहसचिव महेंद्र चव्हाण तर उपाध्यक्ष प्रकाश खैरनार कोषाध्यक्ष प्रेमेंद्र पाटील, सल्लागार प्रा.आय.जी.पठाण, सदस्य नीलम पाठक, विनायक सूर्यवंशी,हेमंत पाटील,सुधीर निकम,हेमंत जाधव,निलेश पाटील,हरीश तांबोळी,जयंती गारोळे आदींची निवड करण्यात आली.