नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 24 जानेवारी 2022 रोजी असली ता.धडगाव येथे राखीव व मुक्काम. मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वाजता असली ता.धडगाव येथून नंदुरबार येथे प्रयाण व मुक्काम.
बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9-15 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. व तळोदा तालुक्यातील गावांना भेटी. गुरुवार 27 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबार येथुन धडगांवकडे प्रयाण व धडगाव तालुक्यातील गावांना भेटी व असली येथे मुक्काम.
शुक्रवार 28 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता धडगाव येथे कार्यकर्त्यासोबत भेट व असली येथे मुक्काम. शनिवार 29 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता तोरणमाळ येथे कार्यकर्त्यासोबत बैठक. तोरणताळ ता.धडगाव येथे 33 के.व्ही.सबस्टेशनच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नंदुरबार कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक व शासकीय वाहनाने धुळे नाशिक मार्ग मुंबईकडे प्रयाण.