Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाखाचे ३६ जनावरे घेतली ताब्यात, दोघांविरूध्द गुन्हा

team by team
July 19, 2021
in क्राईम
0

तळोदा ! प्रतिनिधी

तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाख रुपये कमितीची ३६ जनावरे रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडून ताब्यात घेतली. आहे. याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तळोदा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या आडोशाला ३६ गोवंश कत्तलीच्या इराद्याने पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थेट सापळा रचत बाजार समितीत धडक मारली. तेव्हा हातोडा रस्त्यावरील बाजार समितीच्या एका कोपर्‍यात कुलूप लावलेल्या लोखंडी जाळीच्या दरवाजाच्या आत ३६ गोवंशीय बैल जातीचे जनावरे कत्तलीच्या इराद्याने दावणीला बांधलेले दिसून आले. या जनावरांना कत्तलीसाठी खरेदी करून ते पुढे विक्रीच्या इराद्याने संबंधित व्यापार्‍यांनी आपल्या कबज्यात ठेवले होते. या प्राण्यांना चारा, पाणी, व निवार्‍या व्यवस्था न करता मोकळ्या मैदानात आडोशाला बांधलेले दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच दोघा पंचांना बोलवून त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. जनावरांबाबत पंचांसमोर विचारपूस केली असता रियाज खान रजाक कुरेशी रा. तळोदा व रसूल रहेमान कुरेशी रा. अक्कलकुवा यांची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोघ व्यापार्‍यांविरोधात तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघ व्यापार्‍यांनी प्रत्येकी अठरा अठरा गोवंश त्यांच्या कबज्यात ठेवली होती. या ३६ जनावरांची किंमत साधारण ७ लाख रुपये असल्याचे पोलसानी सांगितले ही कारवाई पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पो उप अभय मोरे, पोलीस नाईक विनोद नाईक, युवराज चव्हाण, राजढर जगदाळे, गणेश सोनवणे, मधुकर राऊत, पिंटू अहिरे आंनदा पाटील , स. फौ गोसावी , बापू बागुल, विशाल नागरे यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान पो हे दिलीप भाईदास साळवे यांच्या फिर्यादिवरून पोलीस ठाण्यात दोघा व्यापर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन

Next Post

कोर्टाची पायरी चढविल्याच्या कारणातून विवाहितेचा मारहाण

Next Post

कोर्टाची पायरी चढविल्याच्या कारणातून विवाहितेचा मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add